News Flash

जीत से आगाज

सुनील नरिन आणि गौतम गंभीर या हुकमी एक्कांच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने सहाव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. सामन्याच्या पहिल्या सत्रात सुनील नरिनने आपल्या जादुई फिरकीच्या

| April 3, 2013 11:41 am

सुनील नरिन आणि गौतम गंभीर या हुकमी एक्कांच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने सहाव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. सामन्याच्या पहिल्या सत्रात सुनील नरिनने आपल्या जादुई फिरकीच्या बळावर दिल्लीच्या फलंदाजांना जखडून ठेवले. नरिनने निर्माण केलेल्या दबाबामुळे दिल्लीचा डाव १२८ धावांतच आटोपला. दुसऱ्या सत्रात कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीरने सूत्रधाराची भूमिका निभावताना ४२ धावांची सुरेख खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर फेकल्या गेलेल्या गंभीरने केलेली आश्वासक खेळी त्याच्या चाहत्यांना सुखावणारी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 11:41 am

Web Title: kolkata knight riders start with win
Next Stories
1 विजेंदरची उत्तेजक चाचणी घेण्यास ‘नाडा’चा नकार
2 विजेतेपदासाठी सेरेनाचे पारडे जड
3 संदीप पाटील यांचा मुंबईच्या निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा
Just Now!
X