एप्रिल महिन्यात एएफसी चषक स्पर्धेदरम्यान सामनानिश्चिती करण्यासाठी लेबननमधील फिफाचे अधिकृत पंच अली सबाघ यांनी स्वीकारलेली लाच त्यांना चांगलीच महागात पडली आहे. सबाघ यांना मंगळवारी न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
भारतातील ईस्ट बंगाल आणि टॅम्पिन रोव्हर्स यांच्यात ३ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्याआधी लेबननमधील पोलिसांनी सबाघ यांच्यासह रेषेवरील दोन पंच अली ईद आणि अब्दुल्ला तालेब यांना अटक केली होती. या सामन्यासाठी त्यांच्या जागी अन्य पंचांची नियुक्ती करण्यात आली होती. सामनानिश्चिती करण्यासाठी त्यांना मुली पुरवण्यात आल्या होत्या. ईद आणि तालेब यांना जिल्हा न्यायाधीश लो वी पिंग यांनी तीन महिन्यांची तर सबाघ यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 12:25 pm