News Flash

महाराष्ट्राला दुहेरी अजिंक्यपद

मुलींच्या रंगतदार अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरवर १०-४ असा विजय मिळवला.

अप्रतिम सांघिक खेळाच्या जोरावर महाराष्ट्राच्या कुमार व मुली संघाने सुरत येथे पार पडलेल्या पश्चिम विभागीय कुमार व मुली (१८ वर्षांखालील) अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत दुहेरी अजिंक्यपद पटकावले. महाराष्ट्राने दोन्ही गटांत कोल्हापूरचे कडवे आव्हान मोडून काढले.

मुलींच्या रंगतदार अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरवर १०-४ असा विजय मिळवला. प्रियांकाचा भक्कम बचाव महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक ठरला. प्रियांकाने पहिल्या डावात ५.४० मिनिटे, तर दुसऱ्या डावात ५ मिनिटांची उल्लेखनीय खेळी केली. तिला तन्वी कांबळे (१.३० मिनिटे नाबाद संरक्षण) आणि ऋतुजा खरे व मधुरा पेडणेकर यांनी प्रत्येकी ३ गुण मिळवत चांगली साथ दिली. कोल्हापूरच्या पूजा फटाळे व ऋतुजा खाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

कुमार गटात महाराष्ट्राने ११-९ असा एक डाव व २ गुणांच्या फरकाने कोल्हापूरचे आव्हान परतवले. चिराग आंगलेकर (३.१०मि.), प्रतीक देवरे (२.१० मि.), प्रद्युम्न पाटील ( २.१० मि. व २ गडी) व हृषीकेश मुर्चावडे (२.४० मि. व ३ गडी) यांचा विजयात सिंहाचा वाटा होता.

वैयक्तिक पारितोषिके :

      मुली                                                                   कुमार

संरक्षक : अमृता कोकिटकर (कोल्हापूर)        चिराग आंगलेकर (महाराष्ट्र)

आक्रमक : दीक्षा कदम (महाराष्ट्र)                 डेव्हिड कदम (कोल्हापूर)

अष्टपलू: प्रियांका भोपी (महाराष्ट्र)               हृषीकेश मुर्चावडे (महाराष्ट्र )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 5:30 am

Web Title: maharashtra win kho kho trophy
टॅग : Maharashtra
Next Stories
1 ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करीन – खत्री
2 पुण्यास विजेतेपद मिळवून देईन – भास्करन
3 शास्त्रीसह सहयोगी प्रशिक्षकही भारताच्या प्रशिक्षकपदांसाठी अर्ज करणार
Just Now!
X