भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले सामने हे नेहमी स्लेजिंगसाठी ओळखले जातात. नुकत्याच पार पडलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली-टीम पेन, टीम पेन-ऋषभ पंत यांच्यातलं शाब्दिक द्वंद्व प्रत्येकाने अनुभवलं. २४ तारखेपासून ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध २ टी-२० आणि ५ वन-डे सामने खेळेल. या मालिकेआधी Star Sports वाहिनीने केलेल्या जाहीरातीमध्ये विरेंद्र सेहवागने ऑस्ट्रेलियाच्या संघाची,’बेबीसिटींग’ प्रकरणावरुन खिल्ली उडवली.

विरेंद्र सेहवागच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. इतकच काय तर ज्या टीम पेन आणि ऋषभ पंतमध्ये बेबीसिटींग प्रकरणावरुन द्वंद्व रंगलं होतं, त्या पंतनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.

मात्र आता भारताच्या या टीकेला ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने समर्पक उत्तर दिलं आहे. एका नवीन अँड कँपेनमध्ये हेडनने, सेहवागला, ऑस्ट्रेलियाको बच्चा मत समजना असं प्रत्युत्तर दिलं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून विराट कोहलीने या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे.