26 February 2021

News Flash

गेलने मोडला आफ्रिदीचा विक्रम, झाला षटकारांचा बादशाह

ख्रिस गेलने या सामन्यात आफ्रिदीचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला.

तब्बल १८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटपटू ख्रिस गेल याने वेस्ट इंडिजच्या संघात पुनरागमन केले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. पहिल्याच एकदविसीय सामन्यात गेलने इंग्लडच्या गोलंदाजाची धुलाई करत अनेक विक्रम मोडले.

सुरूवातीला शांत फलंदाजी करणाऱ्या गेलने २४वे एकदिवसीय शतक साजरे केले. ७६ चेंडूत अर्धशतक करणाऱ्या गेलने १०० चेंडूत शतक साजरे केले. गेलने १२९ चेंडूत १३५ धावांची खेळी केली. शतकी खेळीमध्ये गेलने १२ षटकारांची बरसात केली. गेलच्या शतकी खेळीच्या बळावर विडिंज संघाने ३६० धावांचा डोंगर उभा केला. विडिंजच्या संघाने एकूण २३ षटकार लगावले. एकदिवसीय सामन्यात कोणत्याही संघाने लगावलेले हे सर्वाधिक षटकार आहे.

ख्रिस गेलने या सामन्यात आफ्रिदीचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला. आफ्रिदीच्या नावावर ४७६ षटकारांची नोंद आहे. आता गेलच्या नावावर ४८१ षटकारांची नोंद झाली आहे. सर्वाधिक षटकार लगावण्याऱ्या खेळाडूमध्ये गेल अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर आफ्रिदी तर तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा ब्रॅडंन म्यॅक्युलम आहे.

गेलच्या शतकी खेळीच्या बळावर विडिंजने इंग्लंडसमोर ३६१ धावांचे आव्हान ठेवलं होते. इंग्लंडने ४९ षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले. पहिला एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने सहा गड्यांनी विजय साकार केला. आतापर्यंत इंग्लंडचा हा धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय होय. पाच सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने १-०ने आघाडी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 4:53 am

Web Title: most sixes hit in international cricket henrygayle 481
Next Stories
1 कबड्डीपटूंच्या मनमर्जीमुळे संघनिवडीसाठी दिरंगाई!
2 ऑलिम्पिक पात्रतेसाठी प्रणवचे तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित
3 पाकिस्तानविरुद्धच्या लढतींवर बहिष्कार उचित!
Just Now!
X