News Flash

देवांग गांधी यांना ड्रेसिंगरूममध्ये अनधिकृत प्रवेश भोवला

मी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नव्हती,’’ असे गांधी यांनी सांगितले.

| December 27, 2019 12:02 am

देवांग गांधी

कोलकाता : लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांना सोमवारी बंगाल रणजी संघांच्या ड्रेसिंग रूममधून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. सामना चालू असताना खेळाडू आणि मार्गदर्शकांव्यतिरिक्त कुणालाही ड्रेसिंग रूममध्ये जाण्याची परवानगी नसते. ‘‘मी प्रत्येक नियमाचे पालन करतो. बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांना भेटण्यासाठी मी गेलो होतो. परंतु मी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नव्हती,’’ असे गांधी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:02 am

Web Title: national selector devang gandhi asked to leave bengal dressing room zws 70
Next Stories
1 भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकत्रित खेळणार नाहीत -बीसीसीआय
2 मुंबई जिल्हा कबड्डी स्पर्धा : एअर इंडिया, बँक ऑफ बडोदा अजिंक्य
3 अ. भा. मानांकन टेनिस स्पर्धा : महाराष्ट्राच्या सालसाला दुहेरी विजयाची संधी
Just Now!
X