न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आगामी वर्षांसाठी २० करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत सहा नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी किती कालावधी लागेल याची कल्पना नसल्याने माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरीने करारबद्ध होण्यास नकार दिल्याने त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा ख्रिस मार्टिन, रॉब निकोल, डॅनियल फ्लिन, क्रुगर व्हॅन व्ॉक, जेम्स फ्रँकलिन यांना यादीतून डच्चू देण्यात आला आहे. ग्रँट इलिएट आणि पीटर फुल्टन यांचे या यादीत पुनरागमन झाले आहे. कोरे एँडरसन, हॅमीश रुदरफोर्ड, मिचेल मॅकलेनग्घान, टॉम लाथम, कॉलिन मुन्रो आणि ब्रुस मार्टिन यांचा या यादीत पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 8, 2013 4:45 am