पहिल्या दोन कसोटीमध्ये पराभव मिळाल्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर चारी बाजूने टीका होत आहे. यामध्ये आता पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदची भर पडली आहे. सर्फराज अहमदने भारत आणि पाकिस्तानच्या इंग्लंडमधील कामगिरीची तुलना केली आहे. भारतीय संघ का अपयशी ठरतो याबाबत आपले मत व्यक्ते केले आहे.

भारतीय संघापेक्षा इंग्लंडमध्ये पाकिस्तान संघाने चांगली तयारी केली होती. त्यामुळे भारतापेक्षा पाकिस्तान संघाला इंग्लंडमध्ये यश आल्याचे पाकिस्तान संघाला वक्तव्य कर्णधार सर्फराज अहमदने केले आहे. पाकिस्तान संघ इंग्लंडमध्ये गेला तेव्हा तयारी चांगली केली होती. त्यातुलनेने भारतीय संघाने तयारी केली नसल्याचे वक्तव्य करत सर्फराजने विराटसेनेला डिवचले आहे.

‘मी दोन वेळा इंग्लंडचा दौरा केला आहे. आणि या दोन्ही वेळा पाकिस्तानी संघाची कामगिरी उल्लेखनिय होती. आशियाचा प्रत्येक संघ इंग्लंडमध्ये संघर्ष करतोच. भारताही त्याला अपवाद ठरला नाही. इंग्लंडमधील परिस्थितीच तशी आहे.’ असे मत सर्फराज अहमदने व्यक्त केले.गेल्या दौऱ्यामध्ये कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानने तीन सराव सामने खेळले होते. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून आमची कामगिरी उल्लेखनिय होती, त्यामुळे आमची कामगिरी सन्माजनक झाल्याचे सर्फराज अहमद म्हणाला.

सर्फराज अहमदच्या कर्णधारपदाखाली पाकिस्तान संघाने २०१६ मध्ये २-२ आणि २०१८मध्ये १-१ने कसोटी मालिका बरोबरीत सोडली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तिसरा कसोटी सामना १८ तारखेपासून सुरू होत आहे. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने २-० ने आघाडी घेतली आहे.