29 May 2020

News Flash

आयपीएलच्या लिलावातून पाकिस्तानी क्रिकेटपटूंना पुन्हा डच्चू

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणावग्रस्त परिस्थितीमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंना रविवारी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) लिलावातून डच्चू देण्यात आला आहे. मुंबईत २००८मध्ये झालेल्या दहशतवादी

| February 1, 2013 04:50 am

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणावग्रस्त परिस्थितीमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंना रविवारी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) लिलावातून डच्चू देण्यात आला आहे. मुंबईत २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकही पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये सहभागी करून घेण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भरपूर प्रयत्न केले, पण या वर्षी तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.
आयपीएलच्या सहाव्या मोसमाच्या लिलावात १०१ क्रिकेटपटूंवर बोली लागणार असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि त्याचा सहकारी मायकेल क्लार्कवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. पाँटिंग आणि क्लार्क यांना किमान २.१ कोटी रुपयांची मूळ किंमत मिळेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जोहान बोथा आणि भारताचा वेगवान गोलंदाज रुद्रप्रताप सिंग यांना विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरस असेल.
या यादीत भारताचे सात, इंग्लंडचे दोन आणि आर्यलडचा अष्टपैलू खेळाडू केव्हिन ओ’ब्रायन यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2013 4:50 am

Web Title: pakistan players snubbed again for ipl auction
टॅग Ipl,Sport
Next Stories
1 भारत ऑस्ट्रेलियाला चारी मुंडय़ा चीत करेल -हरभजन
2 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यासाठी भारतीय ‘अ’ संघात अभिषेक नायरचा समावेश
3 सायनाने कायम राखले क्रमवारीतील दुसरे स्थान
Just Now!
X