News Flash

राहुल द्रविडला चार कोटींचा गंडा

अनेक क्रीडापटूंना फसवल्याची बाब समोर आली

राहुल द्रविड. (संग्रहित छायाचित्र)

भारताचा माजी कसोटीपटू राहुल द्रविडने बेंगळूरुत त्याला चार कोटींचा गंडा घालणाऱ्या विक्रम इन्व्हेस्टमेंट कंपनीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वी द्रविडने ही तक्रार दाखल केल्याचे सदाशिवनगर येथील पोलीस निरीक्षक नवीन यांनी सांगितले.

द्रविडसह या कंपनीने अनेक क्रीडापटूंना फसवल्याची बाब समोर आली आहे. मात्र, त्याविरोधात तक्रार करणारा द्रविड हा पहिलाच खेळाडू आहे. त्या जोरावर पोलिसांनी कंपनीचे मालक राघवेंद्र श्रीनाथ आणि एजंट सुत्राम सुरेश, नरसिम्हामूर्ती, के. सी. नागराज आणि प्रल्हाद यांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:42 am

Web Title: rahul dravid files police complaint against ponzi firm
Next Stories
1 पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एकाच कुटुंबातील पाच जण ठार
2 India vs Bangladesh T20 : शेवटच्या चेंडूवर षटकार मारत भारताने मिळवला विजय
3 पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भाने पटकावला इराणी करंडक
Just Now!
X