आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी बीसीसीआयद्वारे निलंबित राजस्थान रॉयल्सचा सहमालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा चिंतन स्थितीत गेला आहे. सामना केलेल्या सगळ्याच गोष्टी बदलता येत नाहीत, मात्र कुठल्याही गोष्टीचा प्रत्यक्ष सामना केल्याशिवाय काहीही बदलत नाही, असे कुंद्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी सट्टेबाजीप्रकरणी कुंद्राची कसून चौकशी केली. यादरम्यान कुंद्राने सट्टेबाजी करत असल्याची कबुली दिली होती. हास्य हे रबरी शस्त्र असून, कुणालाही खरंखुरं घायाळ न करता तुम्हाला अपेक्षित माणसाला लक्ष्य करता येतं असे चिंतनात्मक विचार कुंद्राने ट्विटरवर मांडले आहेत. याप्रकरणी मला बळीचा बकरा बनवले गेले आहे. सत्ता उपभोगणाऱ्या मंडळींनी सत्तेचा वापर करत मला तोफेच्या तोंडी दिल्याचे कुंद्रा याने निलंबनानंतर म्हटले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 8:31 am