News Flash

आयपीएल प्रमुखपदाचा शुक्ला यांचा राजीनामा

आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील राजीनामा सत्र सुरूच राहिले आहे. चिटणीस संजय जगदाळे व खजिनदार अजय शिर्के यांच्या राजीनाम्यानंतर आता आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला

| June 2, 2013 04:00 am

आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील राजीनामा सत्र सुरूच राहिले आहे. चिटणीस संजय जगदाळे व खजिनदार अजय शिर्के यांच्या राजीनाम्यानंतर आता आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन यांना पोलिसांनी स्पॉटफिक्सिंग प्रकरणी अटक केल्यानंतर श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली मात्र अद्याप त्यांनी पदाचा त्याग केलेला नाही. त्यांच्यावर दडपण आणण्यासाठी मंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्ला यांनीही येथे शनिवारी राजीनामा दिला.
शुक्ला म्हणाले, गेले काही दिवस मी या संदर्भात विचार करीत होतो. जगदाळे व शिर्के यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ आहे असे मानून मी माझा राजीनामा बीसीसीआयकडे पाठविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 4:00 am

Web Title: rajiv shukla resigns as ipl chief
Next Stories
1 अंकित आणि चंडिलाचे सट्टेबाजांशी आर्थिक व्यवहार असल्याची सट्टेबाज टिंकूची कबुली
2 नदाल, अझारेन्काचे संघर्षपूर्ण विजय
3 बुद्धिबळ : भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर्सना पराभवाचे धक्के
Just Now!
X