12 December 2017

News Flash

इंग्लंडचा संघ अवघ्या १५५ धावांवर गारद

*भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या

रांची | Updated: January 19, 2013 3:21 AM

*भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना
* भारतासमोर १५६ धावांचे लक्ष्य
भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला १५५ धावांवर गुंडाळले. रांची येथे सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्याचा नाणेफेक जिंकून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य ठरल्याचे सद्य स्थितीवरून दिसत आहे. गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळे इंग्लंड संघाला १५५ धावांवर रोखणे भारताला शक्य झाले आहे. आता भारतापुढे १५६ धावांचे आवाहन असून भारताच्या विजयाची सर्व मदार फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. आणि मुख्य म्हणजे रांचीतील या मैदानावर हा पहीला आंतराष्ट्रीय स्वरूपाचा सामना खेळविण्यात येत आहे  

First Published on January 19, 2013 3:21 am

Web Title: ranchi odi england bowled out for 155