News Flash

सचिन तेंडुलकरकडून पारसी बांधवांना नववर्षाच्या शुभेच्छा!

तुम्हाला येणारे वर्ष उत्साहाचे आणि आनंदाचे जावो, असा संदेश सचिनने ट्विटरवरून दिला आहे.

सचिन तेंडुलकर

संख्येने कमी परंतु बुद्धीने तल्लख, अशी ओळख असणाऱ्या पारशी बांधवांच्या नूतन वर्ष अर्थात ‘नवरोज’चा उत्साह आज देशभरात पाहायला मिळत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने नववर्षानिमित्त पारशी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हाला येणारे वर्ष उत्साहाचे आणि आनंदाचे जावो, असा संदेश सचिनने ट्विटरवरून दिला आहे.


‘नवरोज’ हा पारशी बांधवांच्या नवीन वर्षांचा पहिला दिवस. पारशी बांधवांच्या या नवीन वर्षांची लगबग नवरोज आधी दहा दिवसांपासूनच सुरू होते. नवरोज आधीच्या या दहा दिवसांना ‘मुक्ताद’ असे म्हटले जाते. परंतु नवरोज आधीचे पाच दिवस पारशी बांधवांसाठी अधिक महत्त्वाचे असतात. या दिवसांमध्ये कुटुंबातील दिवंगत व्यक्तींची आठवण काढून इतर कुटुंबियांकडून त्याविषयी दु:ख व्यक्त करण्यात येते. नवरोजच्या आदला दिवस म्हणजे पतेती. पतेतीच्या दिवशी पारशी बांधव देवाची प्रार्थना करतात आणि केलेल्या चुकांविषयी क्षमा मागतात. पतेतीनंतर उजाडणारा दिवस म्हणजेच ‘नवरोज’. मराठमोळी संस्कृतीला साजेसे अशा वाटणाऱ्या रांगोळ्या पारशी बांधव आपल्या घराबाहेर काढतात. पारशी बांधव आपल्या घराच्या दाराला तोरणही बांधतात. शेवया, ड्रायफ्रुट यांचे मिश्रण असणारा असा पोषक नाश्ता पारशी बांधवांच्या घरी करण्यात येतो. त्यानंतर अंघोळ करून, नवीन कपडे परिधान करून पारशी बांधव त्यांच्या धर्मस्थळात म्हणजेच ‘अग्यारी’त किंवा ‘आतश बेहराम’ येथे जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 3:02 pm

Web Title: sachin tendulkar wishes parsi community navroz mubarak
Next Stories
1 दीपा कर्माकरची खेलरत्नसाठी शिफारस
2 Video : ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये ६० फूटांवरून कॅमेरा खाली पडून सात जखमी
3 Rio 2016 : दीपा कर्माकर आणि ललिता बाबरच्या नावाने विमान आणि ट्रेन सुरू करा- सेहवाग
Just Now!
X