भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत सायनाची प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर कॅरोलिना मरिन सामन्यात खेळू शकणार नसल्याचं समजताच तिने माघार घेण पसंत केलं. मात्र सामन्याचं कोर्ट सोडत असताना मरिनला आपले अश्रु अनावर झाले होते.
सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये कॅरोलिना मरिनने चांगली सुरुवात केली होती. एका क्षणाला मरिनकडे 10-4 अशी आघाडी होती. मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलेल्या एका रॅलीदरम्यान कॅरोलिना मरिन विचित्र पद्धतीने पायावर पडली. ज्यामुळे तिला सामन्यातून माघार घ्यावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार कॅरोलिना मरिनला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्यामुळे पुढचे 6-7 महिने ते खेळू शकणार नाहीये.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2019 3:18 pm