News Flash

ह्रदयद्रावक..! छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना क्रीडा जगतातून श्रद्धांजली

विराट, सेहवाग, योगेश्वर दत्त यांनी व्यक्त केला शोक

छत्तीसगडमध्ये नक्षल आणि जवानांमध्ये चकमक

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा सीमा भागातील जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 22 सैनिक शहीद झाले, तर अनेक जखमी झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अहवालानुसार, कुख्यात नक्षलवादी हिडमाला पकडण्यासाठी सुरक्षा दलाच्या 2000 जवानांचे पथक जंगलात घुसले होते. यावेळी हल्ल्यात नक्षलवाद्यांनी सैनिकांवर हल्ला केला. या चकमकीत जवानांनी 15 नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवांनाना विराट, सेहवाग, जडेजा, योगेश्वर दत्त यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

विजापूरच्या जंगलात काय घडले?

सुकमा-विजापूर सीमाभागात बस्तरच्या दक्षिणेकडे जंगलात नक्षलवाद्यांचा मोठा अड्डा आहे. विजापूरपासून ते सुकमा जिल्ह्यापर्यंत शुक्रवारी रात्री नक्षलविरोधी कारवाई करण्यात हाती घेण्यात आली होती. शनिवारी (3 एप्रिल) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गस्ती पथक आणि पीएलजीएच्या नक्षलवाद्यांमध्ये जोनागुडा गावात चकमक सुरू झाली. ती जवळपास तीन तास सुरू होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 6:31 pm

Web Title: sports world mourns soldiers martyred in sukma bijapur naxal attack adn 96
Next Stories
1 IPLमधील खेळाडूंचे होणार लसीकरण?
2 धोनीसेनेसाठी गूड न्यूज! अष्टपैलू खेळाडू झाला ‘फिट’
3 IPLमध्ये 100 झेल घेणारा एकमेव खेळाडू तुम्हाला माहीत आहे का?
Just Now!
X