मुंबई खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व इन्स्पायर खो-खो आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पध्रेत कुमार गटात ओम समर्थ भारतने तर मुलींमध्ये श्री समर्थ व्यायाम मंदिराने विजेतेपद पटकावले.

मुलींच्या अंतिम लढतीत श्री समर्थने अमरिहद मंडळाचा ८-५ असा अवघ्या तीन गुणांनी पराभव केला. मध्यंतराला घेतलेली दोन गुणांची आघाडी श्री समर्थसाठी उपयुक्त ठरली. श्री समर्थतर्फे भक्ती धांगडेने ४:३० मि. नाबाद; ५:०० मि. असे संरक्षण केले व एक गडी बाद करत अष्टपलू खेळ केला तर तिला सिद्धी हरमळकरने १:३० मि., २:०० मि. असे संरक्षण करत २ गडी बाद केले, तर दक्षिता यादवने ३:०० मि.; १:२० मि. असा पळतीचा खेळ करत उत्तम साथ दिली.

कुमार गटात ओम समर्थ भारतने शुभम शिगवण याच्या दमदार व अनुभवी संरक्षणाच्या जोरावर श्री समर्थ व्यायाम मंदिरचा ७-५ असा एक डाव व २ गुणांनी दणदणीत विजय प्राप्त केला. अवघ्या एका मिनिटात २ गडी बाद करूनही शुभमच्या ६:०० मि. खेळीमुळे ओम समर्थने मध्यंतराला तब्बल ७ गुणांची आघाडी मिळवत फॉलोऑन लादले. शुभमने ३:३० मि. नाबाद, ४:०० मि. संरक्षण करीत आक्रमणात ३ गडी टिपून अष्टपलू खेळ केला तर अनिकेत गावडेने ३:३० मि., २:३० मि. संरक्षण व एक गडी बाद करत तर ओंकार शिरधनकरने २:०० मि.; २:०० मि. पळतीचा खेळ करत एक गडी बाद करून विजेतेपद मिळवले. अनिकेत गावडे आणि संजना कुडव सवरेत्कृष्ट संरक्षक ठरले. प्रतीक होडावडेकर आणि दक्षिता यादव यांना सवरेत्कृष्ट आक्रमकपटू म्हणून गौरवण्यात आले. सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून शुभम शिगवण आणि भक्ती धांगडे यांची निवड झाली.