कधी कधी अंतिम फेरीपेक्षा उपांत्य फेरीचा सामना अधिक रंगतदार होतो, असेच मुंबई महापौर-श्री शरीरसौष्ठव स्पर्धेतही पाहायला मिळाले. या स्पर्धेचे जेतेपद सुनीत जाधवने एकहाती पटकावले खरे, पण त्याला ८० किलोवरील गटामध्ये किरण पाटीलने कडवे आव्हान दिले होते. या दोघांना गटामध्ये तुलनेसाठी एकत्र बोलावले तेव्हा या दोघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. काही प्रेक्षक किरणच्या बाजूने होते, तर काही सुनीतच्या; पण पंचांनी या गटात सुनीतच्या गळ्यात विजेतेपदाची माळ घातली. त्यानंतर मात्र सुनीतला विजेतेपदाचा मानकरी घोषित करणे, ही औपचारिकताच होती. या स्पर्धेतील सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शनाचा पुरस्कार विरेश धोत्रेने पटकावला.
अंधेरी येथील वर्सोवाजवळील मदानात पार पडलेला मुंबई महापौर-श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या गटांतील स्पर्धेत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. ५५ किलो वजनी गटात नितीन शिगवण, ६५ किलो वजनी गटात सिद्धेश धनावडे अव्वल आला.
६५ किलो वजनी गटात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या गटात जागतिक स्पर्धेतील विजेता नितीन म्हात्रे तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. या गटात प्रतीक पांचाळ पहिला आला. ७०, ७५ आणि ८० किलो वजनी गटांत अनुक्रमे विकास घडवले, आशीष काळोखे आणि अजय पेवेकर यांनी बाजी मारली.
स्पध्रेचा निकाल
५५ किलो वजनी गट : १. नितीन शिगवण, २. उमेश पांचाळ, ३. किशोर कदम. ६० किलो : १. सिद्धेश धनावडे, २. अरुण पाटील, ३. रोशन तटकरे. ६५ किलो : १. प्रतीक पांचाळ, २. संकेत भरम, ३. नितीन म्हात्रे. ७० किलो : १. विकास घडवले, २. संतोष भरणकर, ३. विवेक शिर्के.
७५ किलो : १. आशीष काळोखे, २. सुनील मुरकर, ३. श्रीनिवास खारवी. ८० किलो : १. अजय पेवेकर, २. सकिंद्र सिंग, ३. शशिकुमार नाडर. ८० किलोवरील : १. सुनीत जाधव, २. किरण पाटील, ३. जगदीश लाड.