News Flash

सिंधू अंतिम फेरीत

श्रीकांत, सात्त्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात

(संग्रहित छायाचित्र)

स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत स्विस खुल्या सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र गतविजेत्या किदम्बी श्रीकांतला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तसेच दुसऱ्या मानांकित सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पुरुष दुहेरीतील आव्हानही उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

जगज्जेत्या सिंधूने चौथ्या मानांकित ब्लिचफेल्ड हिला अवघ्या ४३ मिनिटांत २२-२०, २१-१० असे सहज पराभूत केले. यासह सिंधूने योनेक्स थायलंड खुल्या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. आता सिंधूला जेतेपदासाठी स्पेनची अग्रमानांकित कॅरोलिन मरिन हिच्याशी लढत द्यावी लागेल. सिंधूने २०१९ सालच्या जगज्जेतेपदाच्या लढतीनंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे.

पहिल्या गेममध्ये ब्लिचफेल्ड हिने सिंधूला कडवी लढत दिली. पण सिंधूने आक्रमक खेळ करत पहिला गेम २२-२० अशा फरकाने आपल्या नावावर केला. पहिला गेम जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या सिंधूने प्रतिस्पर्धीला डोके वर काढण्याची कोणतीही संधी दिली नाही. दुसरा गेम २१-१० असा आरामात जिंकत तिने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या श्रीकांतला डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेन याच्याकडून हार पत्करावी लागली. अग्रमानांकित अ‍ॅक्सेलसेनने ही लढत २१-१३, २१-१९ अशी आरामात जिंकत अंतिम फेरी गाठली.

सात्त्विक-चिराग जोडीला डेन्मार्कच्या किम अ‍ॅस्ट्रप आणि अँडर्स स्कारूप रासमुसेन यांच्यासमोर प्रभाव पाडता आला नाही. अखेर त्यांचे आव्हान १०-२१, १७-२१ असे संपुष्टात आले.

* सामन्याची वेळ : सायं. ५.०० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:10 am

Web Title: swiss open badminton tournament sindhu in the final abn 97
Next Stories
1 विनेश फोगटची चमकदार कामगिरी
2 IPL 2021 ची तारीख ठरली! आता फक्त GC च्या परवानगीची प्रतिक्षा!
3 इंग्लंडचा पराभव करत भारताने गाठली वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपची अंतिम फेरी
Just Now!
X