गोल्डकोस्ट : आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघातर्फे आयोजित जागतिक ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत भारताच्या हरमीत देसाई आणि सौम्यजीत घोष जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत चौथ्या मानांकित क्वान किट आणि लाम सियू हांग जोडीने सौम्यजीत-हरमीत जोडीवर ११-४, ११-४, ८-११, ११-४ अशी मात केली.