News Flash

विराटसेनेचा ‘भीमपराक्रम’! सलग तिसऱ्यांदा ICC कडून मिळवली मानाची गदा

विराट कोहलीला मानाची गदा प्रदान करून टीम इंडियाचा सन्मान

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखत ICC Test Championship Mace म्हणजे ICC कडून मानाची गदा मिळवली. या मनाच्या गदा पुरस्कारासोबतच टीम इंडियाला १ मिलियन डॉलरचे रोख रकमेचे बक्षीसही देण्यात आले. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत प्रत्येक संघाची कसोटी कामगिरी पाहून जो संघ वर्षाअखेरीस (१ एप्रिल) अव्वल स्थानी विराजमान होतो, त्या संघाला ही मानाची गदा आणि रोख रकमेचा पुरस्कार दिला जातो. टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार मिळाला. ICC कडून विराट कोहलीला मानाची गदा प्रदान करून टीम इंडियाचा सन्मान करण्यात आला.

संघाच्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडने दुसरे स्थान पटकावले आहे. बांगलादेशविरुद्ध मिळवलेल्या कसोटी मालिका विजयाच्या बळावर त्यांना वर्षअखेरीस दुसऱ्या स्थानी विराजमान होता आले आहे. या यादीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.

हा सन्मान स्वीकारताना विराट म्हणाला की कसोटी क्रिकेमधील मानाची गदा कायम राखण्यात टीम इंडियाला यश आले याचा मला आनंद आहे. मला टीम इंडियाचा गर्व आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे. अशा वेळी असा सन्मान प्राप्त करणे हे फारच उत्साहवर्धक आहे. कसोटी क्रिकेटचे महत्व आणि स्थान आम्ही सारे जाणतो. तसेच या क्रिकेट प्रकारात उत्तम कामगिरी कशी करावी हेदेखील आम्हाला माहिती आहे.

टीम इंडियाच्या कसोटी संघात अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा भरणा आहे. क्रिकेट चॅम्पियनशीप सुरु झाल्यावर याच्या जोरावर टीम इंडिया चांगली कामगिरी करेल. या स्पर्धेसाठी आम्ही खूप आतुर आहोत, कारण कसोटी क्रिकेटमध्ये हा एका नवा अध्याय असेल, असेही विराट म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 6:46 pm

Web Title: team india captain virat kohli retain icc test championship mace
Next Stories
1 Koffee With Karan : ‘हार्दिक पांड्या हाजीर हो’; BCCI च्या लोकपालांचे आदेश
2 IPL 2019 : पराभवापाठोपाठ अजिंक्य रहाणेला आणखी एक धक्का
3 मैदानातून कॉमेंट्री, टॉसऐवजी ट्विटर पोल; ICC चे नवीन नियम खरे की एप्रिल फूल??
Just Now!
X