27 February 2021

News Flash

रोहितच्या ‘या’ दोन सवयीमुळे पत्नी रितिका आहे त्रस्त

लाईव्ह चॅटमध्ये रोहितनेच केला खुलासा

संपूर्ण जगात सध्या करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोनामुळे भारत सुमारे अडीच महिने लॉकडाउन होता. मात्र आता हळूहळू लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असे असले तरी अद्याप क्रिकेटचा हंगाम सुरू झालेला नाही. त्यामुळे क्रिकेटपटू घरातच आहे. या काळात आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी अनेक खेळाडू लाईव्ह व्हिडीओ चा आधार घेत आहेत. नुकताच भारताचे तीन सलामीवीर एकत्र एका लाईव्ह व्हिडिओमध्ये दिसले. मयंक अग्रवालच्या लाईव्ह चॅट शो मध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघे सहभागी झाले. त्यावेळी काही मजेशीर गोष्टींचा उलगडा झाला.

या गप्पामध्ये मयंकने रोहित शर्माच्या अशा दोन सवयी सांगितल्या, ज्या त्याची पत्नी रितिकाला त्रस्त करतात. रितिका जेव्हा रोहितला काही गोष्ट सांगत असते, तेव्हा बरेच वेळा तो ती गोष्ट ऐकल्यासारखी करतो पण खरं तर त्याचं तिच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नसतं. रोहितने रितिकाची ही तक्रार मान्य केली. तो असंही म्हणाला की अनेकदा रितिका मला काही गोष्टी हव्या असल्याची यादी सांगते. पण मी ते विसरून जातो. त्यामुळे मला पुन्हा तिला सगळी यादी विचारावी लागते.

त्यानंतर मयंकने रोहितच्या दुसऱ्या सवयीबद्दलही सांगितलं. रोहितच्या सतत नखं खाण्याच्या सवयीचा रितिकाला खूप राग येतो असे त्याने सांगितलं. रोहितने ही गोष्ट सुद्धा मान्य केली आणि आता मी नखं खाणं खूप कमी केल्याचंही सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 4:38 pm

Web Title: two funny habits of rohit sharma that annoy his wife ritika sajdeh reveals mayank agrawal vjb 91
Next Stories
1 आर्थिक चणचण दूर करण्यासाठी माजी सुपरकार रेसर बनली पॉर्नस्टार
2 आयपीएलमध्ये वर्णद्वेषाचा सॅमीचा आरोप ठरला खरा, इशांत शर्माने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला होता उल्लेख
3 बलात्काराचे खोटे आरोप करत मला संघाबाहेर केलं – अख्तर
Just Now!
X