भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. ५३ किलो वजनगी गटात विनेशने ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीवर ४-१ ने मात केली. कझाकस्तानमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत विनेशने बुधवारी दुपारी रेपिचाजचे दोन्ही राऊंड जिंकत २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं.

या कामगिरीसह २०२० टोकियो ऑलिम्पिकला पात्र होणारी विनेश पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. २०१६ साली रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुखापतीमुळे विनेशला माघार घ्यावी लागली होती. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतलं विनेशचं हे पहिलं पदक ठरलं आहे. मागील ३ स्पर्धांमध्ये विनेशला रिकाम्या हाताने परतावं लागलं होतं. मात्र यंदा विनेशने कांस्यपदकासह ऑलिम्पिक प्रवेश निश्चीत केल्यामुळे हा विजय तिच्यासाठी खास मानला जात आहे.

अवश्य वाचा – कुस्तीपटू विनेश फोगट २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र