पुढील महिन्यात हरारे येथे दोन कसोटी आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वे पाकिस्तानविरुद्ध यजमानपद भूषवणार आहे. 21 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या मालिकेचे सर्व सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जातील. जानेवारी 2020मध्ये श्रीलंकेनंतर झिम्बाब्वेला भेट देणारा पाकिस्तान हा पहिला संघ असेल. कोरोनाच्या साथीमुळे नेदरलँड्स, आयर्लंड, अफगाणिस्तान आणि भारत यांनी गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्धची मालिका स्थगित केली होती.

 

जुलै 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निलंबित केल्यापासून झिम्बाब्वे कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी धडपडत आहे. आयसीसीने ऑक्टोबर 2019 मध्ये हे निलंबन मागे घेतले आहे. तरीही, या संघाला कसोटी सामने खेळता आलेले नाहीत.

या महिन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेने यूएईमध्ये अफगाणिस्तानबरोबर कसोटी आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळली. 21 ते 25 एप्रिल दरम्यान झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 मालिका आणि 29 एप्रिल ते 11 मे दरम्यान कसोटी मालिका खेळली जाणार आहे.