Premium

“मुलाने डोळ्यावर लाथ मारली, दोन वर्ष मी..”, एबी डिव्हिलियर्सचा किस्सा ऐकून डॉक्टरही विचारू लागले, कसं शक्य आहे?

AB DE Villiers Eye Injury: डिव्हिलियर्स सांगतो की, त्यावर मात करायला मला थोडा वेळ लागला आणि नंतर, जेव्हा मी पुनरागमन करण्याचा विचार केला होता पण त्या वेळी मला गरजेची असलेली (क्रिकेटची) संस्कृती मला जाणवली नाही.

AB de Villiers Son Kicks His Eye Causing last two years of his career with a detached retina Doctors Shocked Asking How He Played
आंतरराष्ट्रीय निवृत्ती का मागे घेतली नाही याबद्दल डिव्हिलियर्सने खुलासा केला आहे (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

AB de Villiers Eye Injury: एबी डिव्हिलियर्सने विस्डेन क्रिकेट साईटसह चर्चेत आपल्या आयुष्यातील कठीण दोन वर्षाच्या कालावधीविषयी भाष्य केले. करिअरमधील मागील दोन वर्ष तो डोळ्याच्या गंभीर दुखापतीसह क्रिकेट खेळला आहे असे त्याने सांगितले आहे. डिव्हिलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली मात्र अजूनही तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल खेळतोय. २०१९ मध्ये तो कदाचित आणखी एक विश्वचषक खेळेल अशा चर्चा रंगत होत्या पण डिव्हिलियर्सने आपला निर्णय बदलला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती का मागे घेतली नाही याबद्दल डिव्हिलियर्स म्हणाला, “कोविडने नक्कीच निर्णयावर ठाम राहण्यात मोठी भूमिका बजावली, यात काही शंका नाही. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून, २०१५ च्या विश्वचषकाने मोठे नुकसान केले. त्यावर मात करायला मला थोडा वेळ लागला आणि नंतर, जेव्हा मी पुनरागमन करण्याचा विचार केला होता पण त्या वेळी मला गरजेची असलेली (क्रिकेटची) संस्कृती मला जाणवली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ab de villiers son kicks his eye causing last two years of his career with a detached retina doctors shocked asking how he played svs

First published on: 08-12-2023 at 10:42 IST
Next Story
Sreesanth Controversies : हरभजन सिंगपासून ते गौतम गंभीरपर्यंतच्या ‘या’ पाच सर्वात मोठ्या वादात श्रीसंतच्या नावाचा समावेश