Sunil Gavaskar Statement Virat Kohli Will Miss IPL 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याने आपल्या या बाळाच्या जन्मासाठी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यानी बीसीसीआयला आधीच माहिती दिली होती. विराटला सुरुवातीच्या सामन्यांपासून बाहेर राहण्याची परवानगी दिल्यानंतर बोर्डाने त्याला संपूर्ण मालिकेतून बाहेर राहण्याची परवानगी दिली होती. अशात आता विराट कोहलीबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. सुनील गावसकर यांनी किंग कोहलीच्या आयपीएल खेळण्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारतीय संघाने सलग तीन विजयांची नोंद करून मालिका जिंकली आहे. विराट कोहली सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यातही खेळणार नाही. तो वैयक्तिक कारणांमुळे खेळत नाहीये. आता किंग कोहली आयपीएल २०२४ मधूनही बाहेर राहू शकतो, अशी भीती माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली.

‘कदाचित तो आयपीएलही खेळणार नाही’ –

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे रांची येथे एका स्टार स्पोर्ट्स कार्यक्रमात आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आले की विराट आयपीएल खेळणार की नाही? तर गावस्कर म्हणाले, ‘तो खेळेल का? काही कारणांमुळे सध्या तो खेळत नाही. कदाचित तो आयपीएलही खेळणार नाही.’

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : “त्याने दबावात संयम दाखवला आणि…”, मालिका विजयानंतर रोहितकडून ध्रुव जुरेलचे कौतुक

आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून आयपीएल सुरूवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नईमध्ये गतविजेत्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. त्यामुळे आरसीबीच्या चाहंत्याच्या ह्रदयाची धडधड वाढली आहे. किंग कोहलीने काही दिवसापूर्वीच आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्याने तो आणि अनुष्का दुसऱ्या आई-बाबा झाल्याची माहिती देताना पुत्ररत्न झाल्याची माहिती दिली होती.