मुंबईचा अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी संघामध्ये अजिंक्यची संघात निवड झाली आहे. अजिंक्य या मालिकेत उप-कर्णधार म्हणून जबाबदारीही पार पाडेल. या दौऱ्यासाठी अजिंक्य सध्या कसून मेहनत करतोय. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अजिंक्यने आपल्या जिममधील वर्कआऊटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

विश्वचषक संघात स्थान नाकारल्यानंतर अजिंक्यने काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. हॅम्पशायर संघाकडून खेळताना अजिंक्यने एक शतकही झळकावलं. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत अजिंक्य कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.