सलग दुसऱ्या हंगामात मानाच्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाविरुद्ध शेष भारत संघाची घोषणा करण्यात आली आहे. इराणी चषकासाठी मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे शेष भारत संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. १२ ते १६ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमध्ये हा सामना रंगणार आहे. अजिंक्यसोबत मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर यांनाही शेष भारत संघात स्थान देण्यात आलं आहे.

इराणी चषकासाठी असा असेल शेष भारताचा संघ –

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयांक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंह, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौथम, धर्मेंद्रसिंह जाडेजा, राहुल चहर, अंकित राजपूत, तन्वीर उल-हक, रोनित मोरे, संदीप वारियर, रिंकू सिंह, स्नेल पटेल