जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील आठ प्रमुख केंद्रांची २०२७च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी जोहान्सबर्गमधील वॉण्डरर्स, डरबनमधील किंग्जमीड, केप टाऊनमधील न्यूलॅण्ड्स या केंद्रांनाही अंतिम पसंती देण्यात आली आहे.

२०२७ सालची विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात येणार आहे. सामने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होतील. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे संघांना या स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला असून, नामिबियाला मात्र आफ्रिकन पात्रता फेरीत खेळावे लागेल.सेंच्युरियन पार्क, सेंट जॉर्ज पार्क, बोलँड पार्क, मँगौंग ओव्हल आणि बफेलो पार्क या दक्षिण आफ्रिकेतील अन्य केंद्रांवरही स्पर्धेतील काही सामने होणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Along with wanderers kingsmead newlands will host 2027 world cup matches sport news amy
First published on: 11-04-2024 at 08:02 IST