कामाच्या ताणातून प्रत्येकजण थोडा वेळ कुटुंबासाठी काढतो, याला सेलीब्रिटीही अपवाद नाहीत. बॉलीवूडमधली आघाडीची हिरॉईन अनुष्का शर्मा हिनेदेखील हातातली कामं बाजुला ठेवली असून विराट कोहलीला चीअर करायला ती इंग्लंडला गेल्याचे वृत्त आहे. भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर असून ६ जुलै रोजी टी-२० खेळणार आहे. सोफिया गार्डनमध्ये होणाऱ्या सामन्यात विरााटला प्रोत्साहन देताना अनुष्का स्टँडमध्ये बघायला मिळेल. इंग्लंडमध्ये विराटबरोबर फिरतानाचे फोटो व व्हिडीयो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/BkzsIFYHMd-/

उद्या होणाऱ्या या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून समुद्रालगत असलेल्या कार्डिफ या शहरात विराट व अनुष्का पर्यटक म्हणून फिरताना दिसले आहेत. साधारणपणे अशा महत्त्वाच्या सामन्यांच्या आधी खेळाडू तणावात असतात. त्यामुळे अशावेळी जवळच्या व्यक्ती सोबत असतील तर तणाव कमी होण्यास व खेळावर लक्ष केंद्रीत होण्यास मदत होते. परंतु यापूर्वी अनुष्काच्या उपस्थितीमुळे विराटच्या खेळावर प्रतिकूल परिणाम झाल्याची टीका अनेकांनी केली होती. मात्र, माझ्या खेळाच्या बाबतीत अनुष्काला दोष देऊ नका, व आमच्या व्यक्तिगत गोष्टींपासून लांब रहा असे विराटने टिकाकारांना खडसावले होते.

https://www.instagram.com/p/Bk0t2SFHUD5/

विराट व अनुष्का बसमध्ये असतानाचे फोटोही व्हायरल होत आहेत. दोन वर्ष डेट केल्यानंतर गेल्या वर्षी इटालीमध्ये विराट अनुष्कानं लग्न केलं. मीडियानं व चाहत्यांनी प्रचंड फॉलो केलेलं हे कपल असून विराट इंग्लंडमध्ये खेळत असताना चाहत्यांच्या नजरा व कॅमेरामनची लेन्स अनुष्काला स्टँडमध्ये धुंडाळणार यात शंका नाही.