मेस्सीशिवाय अर्जेटिना विजयी

संघातील प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सीला विश्रांती देऊन मैदानात उतरलेल्या अर्जेटिना संघाने रविवारी फेडेक्स फिल्ड येथे झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत एल साल्वाडोर संघाचा २-० असा पराभव केला़

संघातील प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सीला विश्रांती देऊन मैदानात उतरलेल्या अर्जेटिना संघाने रविवारी फेडेक्स फिल्ड येथे झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत एल साल्वाडोर संघाचा २-० असा पराभव केला़  
साल्वाडोरच्या नेस्टर रेन्डेरॉस याने स्वयंगोल करून अर्जेटिनाला भेट दिली़  या गोलच्या जोरावर अर्जेटिनाने १-० अशा आघाडीसह सामन्यावर पकड घेतली़  ८८व्या मिनिटाला फेडेरिको मॅन्कुएलोने अर्जेटिनासाठी दुसरा गोल नोंदवला आणि साल्वाडोर संघाचे आव्हान येथेच संपुष्टात आणल़े  अर्जेटिनाची ही विजयी वाटचाल मेस्सी पॅव्हेलियनमध्ये बसून पाहत होता़  
दुखापतीमुळे मेस्सीला विश्रांती देण्यात आली होती़  गेल्या रविवारी रिअल माद्रिदविरुद्ध खेळताना मेस्सीच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. बार्सिलोनाने ही लढत २-१ अशी जिंकली होती़  दुखापतीमुळे मेस्सीला अर्जेटिनाच्या सराव सत्रात सहभागी होता आले नव्हत़े  त्यामुळे अर्जेटिनाचे प्रमुख गेराडरे माटिन्हो यांना मेस्सीच्या बाबतीत कोणतीही जोखीम उचलायची नव्हती, म्हणून त्यांनी मेस्सीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला़

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Argentina manage without messi in win over el salvador

ताज्या बातम्या