ENG vs AUS, Ashes 2023:  अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे खेळला जात आहे. ज्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील पहिली कसोटी खेळणारा वेगवान गोलंदाज मार्क वुडने शानदार सुरुवात केली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला जबरदस्त चेंडूवर क्लीन बोल्ड करून आपल्या संघाला आणखी एक मोठे यश मिळवून दिले. ख्वाजाने ३७ चेंडूत १३ धावा केल्या आहेत.

वास्तविक, मार्क वुडने इंग्लंडसाठी डावातील १३वे षटक टाकण्यासाठी तो आला होता. या षटकामध्ये पहिले ४ चेंडू डॉट्स गेले. त्याने चारही चेंडू हे आउट स्विंग टाकले. ख्वाजाने त्यातील एका चेंडूवर बीट झाला आणि तीन चेंडू सोडले. पाचव्या चेंडूवर दोन धावा आल्या आणि शेवटच्या चेंडूवर त्याने उस्मान ख्वाजाला क्लीन बोल्ड केले. शेवटचा चेंडू इतका वेगात होता की उस्मान ख्वाजाला काही मिनिटे कळालेच नाही. मार्क वुड वेगाने धावत आला आणि त्याने इनस्विंग चेंडू टाकला, ज्यावर ख्वाजा चारीमुंड्या चीत झाला. चेंडूने लेग स्टंपला उखडवला. ज्या चेंडूवर ख्वाजा बाद झाला तो ९४.६mph वेगात होता. चेंडू हवेत स्विंग झाला जरी ख्वाजा डिफेंड करायला गेला असता तरी तो पायचीत (LBW) झाला असता.

Jake Fraser's Second Fastest Half-Century for Delhi in DC vs MI Match
DC vs MI : जेक फ्रेझरने वादळी अर्धशतक झळकावत रचला इतिहास, दिल्लीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

सामन्यात काय झाले?

सामन्याबद्दल जर बोलायचे झाले तर, उपहारापर्यंत पहिल्या दिवसाच्या सत्रात इंग्लंड वरचढ ठरले. ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्स गमावून ९१ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर ४ (५), उस्मान ख्वाजा १३ (३७), मार्नस लाबुशेन १७ (५८) बाद झाले. स्टीव्ह स्मिथ आपल्या १००व्या कसोटीच्या पहिल्या डावात काही विशेष करू शकला नाही. तो ३१ चेंडूत २२ धावा करून तो बाद झाला. स्टुअर्ट ब्रॉडने त्याला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. आता ट्रॅव्हिस हेड १० (१८) आणि मिचेल मार्श ५ (९) क्रीजवर आहेत.  इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने २ विकेट्स घेतल्या  आणि मार्क वूड, ख्रिस वोक्सने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

हेही वाचा: मेहेंदी है रचने…; सुंदर वधूला न्यायला घोड्यावर बसून शाही थाटात पोहोचला हॅरिस रौफ, रंगारंग मेजवानीचा पाहा Video

अ‍ॅशेस मालिकेची सद्य स्थिती

पाच कसोटी सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया २-०ने आघाडीवर आहे. कांगारू संघाने मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. एजबॅस्टन येथे खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने २ गडी राखून जिंकला, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी इंग्लंडचा ४३ धावांनी पराभव केला. आता मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडला तिसरी कसोटी जिंकावी लागणार आहे.