१५ सप्टेंबर पासून सहा देशांमध्ये आशिया चषकांसाठी लढत सुरू होणार आहे. तर २८ सप्टेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना दुबई येथे खेळला जाणार आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने आशिया चषकाची सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ खेळणार असून अ गटात भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना स्थान मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(जाणून घ्या आशियाई चषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या खलिल अहमद विषयी)

आशिया चषकामध्ये भारताचा पहिला सामना १८ सप्टेंबर रोजी हाँगहाँग संघासोबत होणार आहे. तर १९ सप्टेंबर रोजी भारत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. २०१६ मध्ये झालेल्या आशिया चषकावर भारतीय संघाने नाव कोरले होते. भारताने आतापर्यंत सहा वेळा आशिया चषकावर नाव कोरले आहे. यामध्ये पाच एकदिवसीय आणि एक टी-२० फॉर्मेंट होते. भारतीय संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. जाणून घेऊयात आशिया चषकाबदल्लची काही रोचक गोष्टी….

(आणखी वाचा : Asia Cup 2018 : सहा संघामध्ये आशिया चषकासाठी लढत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणता खेळाडू)

– हा १४ वा आशिया चषक आहे. भारताने सहा वेळा आशिया चषकावर नाव कोरले आहे. श्रीलंकाने पाच वेळा तर पाकिस्तानने दोन वेळा आशिया चषक पटकावला आहे.

– २०१६ मध्ये टी-२०च्या पद्धतीने आशिया चषक खेळवला होता. पण यावेळी पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्याच्या पद्धतीने आशिया चषक खेळवला जात आहे.

– आशिया चषकाचे विजेतेपद भारताकडे आहे.

– आशिया चषकातील सर्वात यशस्वी फलंदाज सनथ जयसूर्या आहे. जयसुर्याने १२२० धावा कुटल्या आहेत.

– सर्वात यशस्वी गोलंदाज मुथैया मुरलीधरन आहे. मुरलीधरनने ३० बळी घेतले आहे.

कोणत्या संघाने केंव्हा आशिया चषकावर नाव कोरले –

१९८४ – भारत
१९८६- श्रीलंका
१९८८- भारत
१०९०-९१ -भारत
१९९५ – भारत
१९९७ – श्रीलंका
२००० – पाकिस्तान
२००४ – श्रीलंका
२००८ – श्रीलंका
२०१० – भारत
२०१२ – पाकिस्तान
२०१४ – श्रीलंका
२०१६ – भारत (टी-२०)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup all you need to know about asia cup
First published on: 14-09-2018 at 13:21 IST