India vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया कपच्या सुपर-४ टप्प्यात वाद निर्माण झाला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांसाठी खास राखीव दिवस जाहीर केला आहे. या सामन्यांना देण्यात आलेल्या विशेषाधिकारांवरून वाद सुरू झाला आहे. याबाबत बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्वीट करून स्पष्टीकरण दिले आहे. जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असून ते भारतीय असल्याने त्यांच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.

आशिया चषकाच्या सुपर-४ टप्प्यातील सामने हंबनटोटा येथे हलवण्याऐवजी कोलंबोमध्ये आयोजित केले जात आहेत. परंतु १० सप्टेंबर रोजी होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पावसाच्या शक्यतेमुळे एसीसीने ११ सप्टेंबर हा दिवस राखीव दिवस म्हणून घोषित केला आहे. अशा परिस्थितीत भारत-पाकिस्तान सामन्याला इतकं महत्त्व देण्यावरून वाद सुरू झाला आहे. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास सामना राखीव दिवशी खेळवला जाईल, असे एसीसीने स्पष्ट केले आहे. सामना ज्या स्थितीत पावसामुळे थांबला होता तिथूनच पुढे सुरू होईल.

मात्र, हवामान अहवालानुसार कोलंबोमध्ये ११ सप्टेंबरलाही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण एसीसीच्या या निर्णयावर सोशल मीडियामध्ये वाद सुरू आहे. या निर्णयाबाबत संघांच्या मुख्य प्रशिक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यात श्रीलंका आणि बांगलादेशचे कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक आहेत.

हेही वाचा: IND vs PAK: ‘वर्ल्डकप मधून बाहेर काढू’ असं डिवचणाऱ्या शोएब अख्तरचे दोन दिवसातचं बदलले शब्द; म्हणाला, “भारताला त्यांच्या देशात…”

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने यावर सूचक ट्वीट केले की, “आशिया चषक सुपर-४ टप्प्यातील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी एक राखीव दिवस जोडण्यात आला आहे, ज्याने आशिया चषक स्पर्धेच्या खेळाच्या परिस्थितीतही प्रभावीपणे बदल केले आहेत. परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी, चारही सहभागी संघ आणि ACC यांच्या सहमतीने निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यावर आमचा कुठलाही आक्षेप नाही.”

यानंतर काही वेळातच श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही नेमके हेच ट्वीट केले. श्रीलंका बोर्डाने लिहिले की, “सुपर ११ आशिया चषक सुपर-४ टप्प्यात, भारत-पाकिस्तान सामन्यासाठी सर्व चार सदस्य मंडळांशी सल्लामसलत करून एक राखीव दिवस ठेवण्यात आला होता. एसीसीने मान्य केलेल्या बदलांना प्रभावी करण्यासाठी टूर्नामेंट खेळण्याच्या स्थितीत सुधारणा केली आहे. त्यामुळे वादाचे कुठलेही कारण इथे नाही.”

श्रीलंका आणि बांगलादेशच्या प्रशिक्षकांनी यावर व्यक्त केली नाराजी

टूर्नामेंटमध्ये अशा ऐनवेळी सुधारणा केल्याने एसीसीच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अलीकडेच श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड आणि बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी सिल्व्हरवुड म्हणाला, “जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला थोडे आश्चर्य वाटले. आम्ही स्पर्धेचे आयोजक नाही, त्यामुळे आम्ही याबद्दल फार काही बोलू शकत नाही. जर प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, ही दुसऱ्या दोन संघासाठी समस्या असेल. पण आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही, म्हणून आम्ही चांगली तयारी करत राहतो आणि आमचे सर्वोत्तम देत आहोत.”

हेही वाचा: IND vs PAK: मिशन शाहीन! पाकिस्तानी गोलंदाजांविरोधात भारताने केला जबरदस्त प्लॅन, कशी करत आहे टीम इंडिया तयारी? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हथुरुसिंघा म्हणाला, “स्पर्धेच्या मध्यात नियम बदलला जाणे, असा प्रकार इतर कोणत्याही मोठ्या टूर्नामेंटमध्ये पाहिला नाही. प्रत्येक सहभागी देशाचे प्रतिनिधित्व करणारी एक तांत्रिक समिती असते. त्यांनी हा निर्णय अन्य काही कारणाने घेतला असावा. हे आदर्श खेळाचे उदाहरण नाही तसेच, आम्हालाही एक अतिरिक्त दिवस मिळाला तर आवडेल.”