Team India on Asian Games 2023: २३ सप्टेंबरपासून चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. हांगझाऊ येथे होणाऱ्या खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ६५६ खेळाडू सज्ज झाले आहेत. यावेळी भारताचा हा सर्वात मोठा चमू देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अशा स्थितीत भारतीय खेळाडूंकडूनही प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा, मीराबाई चानू, येथील बजरंग पुनिया हांगझाओ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाडूंकडून देशाला पदकांची अपेक्षा आहे.

नीरज चोप्रा- भालाफेक

जेव्हा आपण पदकाच्या दावेदारांबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे नीरज चोप्रा. स्पर्धकांच्या यादीत नीरज पहिल्या क्रमांकावर आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या २५ वर्षीय खेळाडूने या मोसमात आतापर्यंत भालाफेकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. नीरजने डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर आणि ८७.६६ मीटर फेक केले होते. त्याचबरोबर त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ८८.१७ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ

मीराबाई चानू- वेटलिफ्टिंग

वेटलिफ्टर मीराबाई चानू ही आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्या दोन भारतीय वेटलिफ्टर्सपैकी एक आहे. टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती चानू ४९ किलो वजनी गटात सहभागी होणार आहे. २९ वर्षीय खेळाडूचे थेट लक्ष्य सुवर्णपदकावर असेल. तिने असे केल्यास या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली वेटलिफ्टर ठरेल. मीराबाईने नुकतीच जागतिक स्पर्धाही जिंकली आहे. त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक हे तिच्या कारकिर्दीतील एकमेव पदक आहे जे तिला आतापर्यंत मिळवता आलेले नाही. पोडियममध्ये अव्वल स्थान मिळविण्यासाठी तिला चीनच्या जियांग हुइहुआकडून कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल.

हेही वाचा: Sanju Samson: सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळल्याने इरफान पठाण नाराज; म्हणाला, “मी त्याच्या जागी असतो तर…”

बजरंग पुनियाकुस्ती

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या मोसमात कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारा बजरंग पुनिया हा एकमेव भारताचा कुस्तीपटू होता. बजरंगने टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकले होते. यानंतर आता हांगझाऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली कामगिरी कायम राखण्याचे त्याचे लक्ष्य असेल. तसेच, राष्ट्रकुल स्पर्धेत सलग दोन पदके जिंकणाऱ्या या कुस्तीपटूच्या नजरा चीनच्या सुवर्णपदकावरही असतील. भारताचा रवी दहिया आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नव्हता. अशा परिस्थितीत देशाच्या नजरा फक्त २९ वर्षीय कुस्तीपटू बजरंगवर खिळल्या आहेत. बजरंगला या खेळांच्या चाचण्यांमधूनही सूट देण्यात आली होती.

निखत जरीन-बॉक्सिंग

२७ वर्षीय निखत जरीन आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणार आहे. गेल्या दोन वर्षांत निखत हा भारताचा सर्वोत्तम बॉक्सर म्हणून उदयास आली आहे. २०२२ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चॅम्पियन बनून तिने शानदार कामगिरी केली होती आणि त्यावेळी तिची बरीच चर्चा झाली होती. त्याच वेळी, त्याच वर्षी तिने राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाही निखतला तिचे जागतिक विजेतेपद राखण्यात पूर्णपणे यश आले. अशा स्थितीत बॉक्सिंग स्पर्धेत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकासाठी सर्वांच्या नजरा निखतकडे असतील.

हेही वाचा: ICC WC23 Anthem: ‘दिल जश्न बोले’! आयसीसीने केलं वर्ल्डकप अँथम गीत लाँच, रणवीर अन् धनश्रीचा हटके डान्स, Video व्हायरल

एच.एस. प्रणयबॅडमिंटन

बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉय सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ३० वर्षीय बॅडमिंटनपटूने त्याच्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन कपमध्ये (BWF) उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा केली आहे. वर्षाच्या सुरुवातीला प्रणॉयने मलेशियन मास्टर्सचे विजेतेपद पटकावले आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो उपविजेता ठरला. त्याच वेळी, एच.एस. प्रणॉयने २०२३च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक देखील जिंकले. जर आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनकडे पाहिले तर हा एक असा खेळ आहे ज्यात भारत सुवर्णपदक जिंकण्यात अपयशी ठरला आहे. अशा स्थितीत शटलर प्रणॉयचा फॉर्म पाहता, यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकावर तो आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे.