scorecardresearch

Premium

AUS vs BAN: मिचेल मार्शच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा उडवला धुव्वा, ८ गडी राखून नोंदवला दणदणीत विजय

Cricket World Cup 2023, AUS vs BAN Match Updates: ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर ८ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ३०६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.

US vs BAN World Cup 2023 Latest Score Updates in Marathi
बांगलादेशविरुद्ध मिचेल मार्शने शतक झळकावले (photo source-@SAM_x_49)

Australia vs Bangladesh ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४३ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर ८ गडी राखून विजय मिळवला. या पराभवामुळे बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ३०६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शच्या शतकी खेळीच्या जोरावर दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.

या विजयासह कांगारू संघाने उपांत्य फेरीसाठी आपली तयारी आणखी मजबूत केली आहे. त्याचवेळी या पराभवामुळे बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित ५० षटकांत ८ गडी गमावून ३०६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने ४४.४ षटकांत २ गडी गमावून ३०७ धावा केल्या आणि सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने नाबाद १७७ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने ६३ धावांची नाबाद खेळी खेळली. डेव्हिड वॉर्नरने ५३ धावांचे योगदन दिले.

loksatta analysis why india lost world cup final against australia
ऑस्ट्रेलिया ३ – भारत ०… विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये भारत ऑस्ट्रेलियासमोर का ढेपाळतो?
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
Shamar Joseph who played a key role in West Indies historic victory
AUS vs WI : सुरक्षा रक्षक ते भेदक गोलंदाज; ऑस्ट्रेलियाला धूळ चारणारा वेस्ट इंडिजचा शामर जोसेफ आहे तरी कोण?
Kraig Brathwaite on Rodney Hodge
AUS vs WI : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने वेस्ट इंडिजच्या क्षमतेवर उपस्थित केले होते प्रश्न, क्रेग ब्रॅथवेटने दंड दाखवत दिले प्रत्युत्तर

तौहीद हृदयीने सर्वाधिक धावा केल्या –

तत्पूर्वी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत ८ गडी गमावून ३०६ धावा केल्या. बांगलादेशकडून तौहीद हृदयीने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याने ७९ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तर कर्णधार नजमुल शांतोने ४५ धावा केल्या. याशिवाय तनजीद हसनने आणि लिटन दासने प्रत्येकी ३६ धावा केल्या. त्याचबरोबर महमुदुल्लाहने ३२ धावा, मुशफिकुर रहीमने २१ धावा, मेहदी हसन मिराजने २९ धावा आणि नसुम अहमदने ७ धावा केल्या. महेदी हसन २ धावांवर तर तस्किन अहमद शून्यावर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून शॉन ॲबॉट आणि ॲडम झाम्पाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तसेच मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली.

दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी –

३०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. ट्रॅव्हिस हेड १० धावा करून बाद झाला. यानंतर मिचेल मार्शसह वॉर्नरने डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. मुस्तफिजूरने वॉर्नरला बाद करून ही भागीदारी मोडली. वॉर्नरने ५३ धावा केल्या. यानंतर मार्श आणि स्मिथने एकही विकेट पडू दिली नाही. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १७५ धावांची नाबाद भागीदारी केली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.

हेही वाचा – World Cup 2023: १२ वर्षांपासून टीम इंडियाला उपांत्य फेरीतील विजयाची प्रतीक्षा, जाणून घ्या कसा आहे बाद फेरीतील रेकॉर्ड?

सलग सात विजय मिळवत ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मिचेल मार्शने १३२ चेंडूत १७७ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत १७ चौकार आणि ९ षटकार मारले. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने ६४ चेंडूत ६३ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. बांगलादेशकडून तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aus vs ban match updates australia beat bangladesh by 8 wickets in world cup 2023 vbm

First published on: 11-11-2023 at 18:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×