David Warner’s catch of Cybrand Engelbrecht Video goes viral: आयसीसी विश्वचषक २०२३ च्या २४ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने बुधवारी चमकदार कामगिरी करत एकतर्फी विजयाची नोंद केली. ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी विक्रमी शतक झळकावून नेदरलँडचे काम अवघड करून टाकले. याआधी डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावले होते. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी अर्धशतकी खेळी खेळली. अ‍ॅडम झाम्पा आणि मिचेल मार्श यांनी गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. आता या सामन्यातील डेव्हिड वार्नरने एक अप्रतिम झेल घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा केवळ उत्कृष्ट फलंदाजच नाही, तर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एकीकडे वॉर्नरने बॅटने धुमाकूळ घातला आणि शतक झळकावले, तर दुसरीकडे त्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे दृश्य नेदरलँडसच्या डावातील १४व्या षटकात पाहिला मिळाले.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IPL 2024 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights in Marathi
CSK vs LSG Highlights , IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ६ गडी राखून विजय, स्टॉइनिसच्या १२४ धावांची खेळी ऋतुराजच्या शतकावर पडली भारी
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Updates in marathi
IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडने झळकावले वादळी शतक, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल

सायब्रँड एंजेलब्रेक्टचा घेतला उत्कृष्ट झेल –

१४व्या षटकाचा दुसरा चेंडू मिचेल मार्शने टाकला, क्रीजवर आदळताच उसळला आणि सायब्रँड एंजेलब्रेक्टच्या खांद्याजवळ आला. सायब्रँडने आपली बॅट जोरात फिरवली आणि चेंडू आकाशात पाठवला. इकडे सीमारेषेवर चेंडू जवळ येताना पाहून कमी उंचीच्या डेव्हिड वॉर्नरने सुपरमॅनप्रमाणे हवेत उडी मारून अप्रतिम झेल घेतला. त्यामुळे एंजेलब्रेक्टला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. वॉर्नरचा हा झेल पाहून प्रेक्षक चकीत झाले. डेव्हिड वॉर्नरने फक्त ६ धावाच वाचवल्या नाही, तर शिवाय ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची विकेटही घेतली. चौथ्या क्रमांकावर आलेला एंजेलब्रेख्त २१ चेंडूत १ चौकार मारून ११ धावा करून बाद झाला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Shikhar Dhawan: ‘आज माझ्या पत्नीचा फोन आला होता, ती रडत होती आणि माफी मागत होती’; गब्बरचा VIDEO होतोय व्हायरल

कांगारू संघासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विक्रमी शतके झळकावली. वॉर्नरने सहावे शतक झळकावून माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा तो ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. तर, मॅक्सवेलने शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती खेळी खेळली आणि अवघ्या ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. वॉर्नरने ९३ चेंडूत १०४ तर मॅक्सवेलने ४४ चेंडूत १०६ धावा केल्या.