India to the top of the WTC points table : पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा १७२ धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. कॅमेरून ग्रीनने फलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण मांडले आणि त्याच्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. त्याने या सामन्यात १७४ धावांची खेळी केली. पण ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून न्यूझीलंडची घसरण झाली आहे.

डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये भारताने पटकावले अव्वल स्थान –

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान गमावले आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय संघाने नंबर एकचा मुकुट पटकावला आहे. या पराभवामुळे न्यूझीलंडचे ६० टक्के गुण झाले आहेत. भारतीय संघाचे ६४.५८ गुण आहेत. मात्र विजयानंतरही ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. कांगारु संघाचे ५९.०९ टक्के गुण आहेत.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

इंग्लंडविरुद्ध भारताची दमदार कामगिरी –

भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ मध्ये आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने ५ जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत. एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. टीम इंडिया सध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. भारताने या मालिकेत आधीच ३-१ अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने डब्ल्यूटीसी २०२३-२५ ​​मध्ये ५ सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने ३ जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत.

हेही वाचा – Yuzvendra Chahal : ‘झलक दिखला जा’च्या सेटवर संगीता आणि चहलमध्ये रंगला ‘WWE’ सामना, VIDEO होतोय व्हायरल

न्यूझीलंडचा १७२ धावांनी पराभव –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो चुकीचा सिद्ध झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३८३ धावा केल्या होत्या. कॅमेरून ग्रीनने संघाकडून १७४ धावांची खेळी केली. मिचेल मार्शने ४० धावांचे योगदान दिले. जोश हेझलवूडने २२ धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या १७९ धावांत सर्वबाद झाला होता. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ३६९ धावांचं लक्ष्य दिलं होते, प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९६ धावांवर गारद झाला.