जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीत आणि आनंद पवार यांनी स्विस ग्रां़ प्रि़  गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली़  श्रीकांतने  जर्मनीच्या डायटर डोमकेचा २५ मिनिटांच्या लढतीत २१-१०, २१-१४ असा पराभव केला.़  एमिलने आर्यलडच्या जोशुआ मॅगीचा २१-१६, २१-१० असा पराभव केला़  आनंद पवारला विजयासाठी संघर्ष करावा लागला़  त्याने मलेशियाच्या डॅरेन लियूला १३-२१, २२-२०, २१-१६ असे पराभूत केले. साईप्रणीतने मलेशियाच्या बेरीनो जिअ‍ॅन त्झे वाँगचा २१-११, २१-१३ असा पराभव केला़  पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला़  इंडोनेशियाच्या अ‍ॅबे युसूफ व वाहयू पंकरीआनीआ या जोडीने २१-१८, १८-२१, २१-१६ अशा फरकाने अत्री व रेड्डी यांना पराभूत केल़े़