१८ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी उसळणाऱ्या चेंडूंवर बंदी घालणे हास्यास्पद आहे. हे युवा क्रिकेटपटू जेव्हा वरिष्ठ संघांतून खेळायला लागतील, तेव्हा आखूड टप्प्याच्या चेंडूंवर त्यांच्या मर्यादा स्पष्ट होतील, हे अधिक धोकादायक आहे, असा इशारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने दिला आहे.

आंतरराष्ट्रीय कन्कशनचे माध्यम संचालक मायकेल टर्नर यांनी १८ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी उसळणाऱ्या चेंडूंवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. क्रिकेटमधील नियमावली निश्चित करणाऱ्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) त्यांच्याशी गोलंदाजांच्या उसळणाऱ्या चेंडूंसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती. याबाबत वॉन म्हणाला, ‘‘हा सल्ला अत्यंत हास्यास्पद आहे. सध्याच्या दिवसांत कोणतीही जोखीम ही धोकादायक आहे.’’