चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार १ जूनपासून इंग्लंडच्या धर्तीवर सुरू होईल. पण सर्वांचं लक्ष रविवारी ४ जून रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे असणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमधली ही लढत नक्कीच चुरशीची होईल. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंवरही तितकाच दबाव असेल. तरीही इतर सामन्यांप्रमाणेच पाकविरुद्धचा सामना खेळला गेला पाहिजे. भावना बाजूला ठेवून आम्हाला खेळ करावा लागेल, असे भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज केदार जाधव म्हणाला.

”व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्हाला भावनांना आवर घालता आला पाहिजे. भारत-पाक सामन्याला चाहते आवर्जुन उपस्थित राहतात हे खूप चांगलं आहे.”, असे केदार म्हणाला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आजवरचा निकाल पाहता पाकिस्तानचा संघ २-१ असा आघाडीवर आहे. तर वर्ल्डकप आणि टी-२० वर्ल्डकपमधील आजवरच्या ११ लढतींमध्ये भारताने १० लढतींमध्ये विजय प्राप्त केला आहे.