न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने २०१९ विश्वचषक स्पर्धेत आपला फॉर्म कायम राखत, यशस्वी कर्णधार बनून दाखवलं आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विल्यमसनने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकलं आहे. २००७ साली श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनने ५४८ धावा केल्या होत्या. विल्यमसनने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम आता आपल्या नावे जमा केला आहे. Kane Williamson in 2019 World Cup:Inns - 9Runs - 578Ave - 82.57SR - 74.96100s - 250s - 2Best - 148MoM - 2- Most runs by a captain in a World Cup edition. #EngvNZ #NZvEng #CWC19Final— Bharath Seervi (@SeerviBharath) July 14, 2019 याचसोबत २०१९ विश्वचषक स्पर्धेतही सर्व संघाच्या कर्णधारांच्या तुलनेत विल्यमसनची कामगिरी उजवी ठरली आहे. Captains in #CWC19 Williamson - 550* Finch - 507 Kohli - 443 Du Plessis - 387 Morgan - 362* Gulbadin - 194 & 9 wkts Holder - 170 & 8 wkts Karunaratne - 222 Sarfaraz - 143 Mortaza - 34 & 1 wkt#EngvNZ #NZvIND — Bharath Seervi (@SeerviBharath) July 14, 2019 सलामीवीर मार्टीन गप्टील माघारी परतल्यानंतर विल्यमसनने मैदानात येत संयमीपणे फलंदाजी करत जयवर्धनेला मागे टाकलं.