भारताचा युवा खेळाडू आणि आयपीएलमध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाकडून खेळण्यासाठी सज्ज असलेल्या ऋषभ पंत याच्या वडिलांचे बुधवारी रात्री आकस्मिक निधन झाले. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच ऋषभ थेट घरी रवाना झाला. वडिलांच्या निधनामुळे ऋषभ पंत आयपीएलमधील समावेशाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ८ एप्रिलला दिल्लीचा पहिला सामना खेळविण्यात येणार आहे. पण पितृशोकामुळे ऋषभ आता खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू

ऋषभचे वडील ५३ वर्षांचे होते. बुधवारी रात्री ९ वाजता ऋषभची आई सरोज पंत या त्यांना उठवण्यासाठी गेले असता त्यांनी बराच वेळ काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना त्वरित नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ऋषभला याची माहिती मिळाल्यानंतर त्याने आपल्या संघ व्यवस्थापनाला याची कल्पना देऊन तो घरी परतला. गुरुवारी हरिद्वार येथे ऋषभच्या वडीलांवर अत्यसंस्कार करण्यात आले.

नुकतेच काही महिन्यांपू्र्वी रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना ऋषभने दमदार कामगिरी केली होती. या पार्श्वभूमीवर त्याच्याकडून आयपीएलमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण पितृशोकामुळे ऋषभच्या खेळण्याबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.