आधी कोहलीला लग्नाची मागणी, आता सचिनच्या मुलाशी मैत्री; इंग्लंडची महिला क्रिकेटपटू चर्चेत

इंग्लंड क्रिकेट संघाची ‘सेल्फी गर्ल’ पुन्हा चर्चेत

डॅनियल वेट, आधी विराट कोहली आणि आता अर्जुन सोबत

सर्वात आधी तिने विराट कोहलीला लग्नासाठी मागणी घातली, ती देखील चारचौघांसमोर. त्यानंतर आता तिने आपला मोर्चा वळवलाय सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरकडे. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वेट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलेली आहे.

डॅनियलने इंग्लंडच्या महिला संघाकडून ३३ वन-डे आणि ५६ टी-२० सामने खेळले आहेत. २०१४ साली डॅनियलने विराट कोहलीसोबत फोटो काढत, सोशल मीडियावर त्याला लग्नाची मागणी घातली होती. तिने केलेलं ट्विट अनेक भारतीय नेटीजन्सनी रिट्वीटही केलं होतं. मात्र विराट आणि अनुष्काचं प्रेमप्रकरण सुरु असल्यामुळे डॅनियलची डाळ काही शिजली नाही.

डॅनियल वेट विराट कोहलीसोबत
डॅनियल वेट विराट कोहलीसोबत

 

यानंतर तब्बल ३ वर्षांनी अर्जुन तेंडुलकरसोबतचा फोटो शेअर केल्याने डॅनियल पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. डॅनियल आणि अर्जुनची ओळख एका क्रिकेट सामन्यादरम्यान झाली. यावेळी अर्जुन सचिन तेंडुलकरसोबत लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेटचा सामना बघायला आला होता. यानंतर अर्जुनने इंग्लंडमध्ये क्रिकेट प्रशिक्षणही सुरु केलं होतं. अर्जुन आणि डॅनियल यांच्या वयात चांगलच अंतर असलं तरही अर्जुन आपला चांगला मित्र असल्याचं डॅनियलने म्हणलं आहे.

अर्जुन तेंडुलकरसोबत डॅनियल वेट
अर्जुन तेंडुलकरसोबत डॅनियल वेट

 

अर्जुनसोबतचा फोटो शेअर करताना डॅनियलने,”माझ्या मित्राला लॉर्ड्सच्या मैदानावर पाहुन मला आनंद झालाय. मिनी सचिन!! तो खूप चांगली प्रगती करतोय!!!” अशा आशयाचं ट्विट केलं होतं. विराटला लग्नाची मागणी घातल्यानंतर डॅनियलच्या ट्विटर अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या अचानक वाढली होती. यात बहुतांश लोकं भारतामधून होती. आपल्या फॉलोअर्समधे ८५ टक्के लोकं ही भारतातून असल्याचही डॅनियलने नमूद केलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: England ladies cricketer daniel wet click picture with arjun tendulkar trending on social media