Euro 2016: आईसलँडचा ५-२ असा धुव्वा उडवून यजमान फ्रान्सची उपांत्य फेरीत धडक

फ्रान्सने आईसलँडविरुद्धच्या सामन्यात सुरूवातीपासूनच वर्चस्व गाजवले.

फ्रान्सकडून ऑलिव्हियर जिरुडने १२ व्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले.

युरो चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान फ्रान्सने आईसलँडचा ५-२ असा धुव्वा उडवून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत फ्रान्ससमोर विश्वविजेत्या जर्मनीचे आव्हान असणार आहे. फ्रान्सने आईसलँडविरुद्धच्या सामन्यात सुरूवातीपासूनच वर्चस्व गाजवले.

फ्रान्सकडून ऑलिव्हियर जिरुडने १२ व्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर सामन्याच्या पॉल पोग्बाने १९ मिनिटाला दुसरा आणि दिमित्री पायेटने ४२ व्या मिनिटाला तिसरा गोल करून सामन्यावर पकड निर्माण केली. अँटोनियो ग्रिझमनने ४५ मिनिटाला आणखी एक गोल करून ४-० अशी आघाडी घेऊन युरो चषकात पदार्पण केलेल्या आईसलँडला धक्का दिला.

दुसऱया हाफमध्ये आईसलँडनेही कडवी झुंझ दिली. सिगथॉरसने सामन्याच्या ५६ व्या मिनिटाला गोल करून आईसलँडचे खाते उघडले. पण फ्रान्सच्या जिरूडने आणखी एक गोल करून फ्रान्सची आघाडी ५-१ अशी वाढवली. आईसलँडने अखेरच्या मिनिटापर्यंत लढा दिला. सामन्याच्या ८४ मिनिटाला आईसलँडकडून जार्नसन याने गोल डागला. ९० मिनिटांचा खेळ संपुष्टात आला त्यावेळी यजमानने फ्रान्सने ५-२ अशी लढाई जिंकली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Euro 2016 france end icelands dream run with 5 2 rout