महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा
साखळी गटात इंग्लंड आणि भारताला नमवत ‘सुपर सिक्स’ फेरीत धडक मारणाऱ्या श्रीलंकेचा आता बलाढय़ ऑस्ट्रेलियाशी मुकाबला आहे. ‘सुपर सिक्स’ गटाच्या पहिल्या लढतीत न्यूझीलंडने श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता. त्या पाश्र्वभूमीवर श्रीलंकेसाठी हा सामना म्हणजे ‘करो वा मरो’ असा आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक लढतीत इंग्लंडवर २ धावांनी मात करत सनसनाटी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्व लढतीत विजय मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्धही विजयी परंपरा कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्धार आहे. अनुभवी खेळाडू लिसा स्थळेकरला फॉर्म गवसल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ आणखी मजबूत झाला आहे.