युरोप आणि दक्षिण अमेरिका हे फुटबॉलवर अधिराज्य गाजवणारे दोन खंड. अंतिम फेरीत युरोप वि. अमेरिका असा अंतिम सामना रंगल्याची ही ११वी वेळ. पण विश्वचषकावर तब्बल सात वेळा नाव कोरले आहे ते दक्षिण अमेरिकेतील संघाने. अद्याप एकाही युरोपियन संघाला अमेरिकन भूमीत जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे रविवारी ऐतिहासिक मॅराकाना स्टेडियमवर जर्मनी आणि अमेरिका यांच्यात होणारा हा सामना युरोप वि. अमेरिका या दोन खंडांमध्ये रंगणार आहे. जर्मनीने आठ वेळा अंतिम फेरीत मजल मारली असून तर  त्यांना चार वेळा जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. – हल्ला गोल

*अर्जेटिना-जर्मनी यांच्यात विश्वचषकाचा तिसरा अंतिम सामना रंगणार
*१९८६मध्ये अर्जेटिनाचा पश्चिम जर्मनीवर ३-२ने विजय
*१९९०मध्ये पश्चिम जर्मनीची अर्जेटिनावर मात करून सव्याज परतफेड
*अर्जेटिनाची १९७८, १९८६मध्ये विश्वचषकावर मोहोर
*जर्मनीला १९५४, १९७४, १९९०मध्ये विश्वविजेतेपद, चार वेळा जेतेपदाने हुलकावणी