विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोने पोर्तुगालसारख्या आघाडीच्या संघाला १-० अशा फरकाने पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आता उपांत्य फेरीत त्यांची गाठ गतविजेत्या फ्रान्सशी पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी मोरक्कोचा संघ अडचणीत सापडल्याची चिन्हं दिसत आहेत. स्पेनविरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर मोरक्कोच्या संघाने मैदानामध्ये केलेली एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मोरक्कोच्या काही खेळाडूंनी स्पेनला पराभूत केल्यानंतर मैदानात विजयाचा आनंद साजरा करताना पॅलेस्टाइनचा झेंडा फडकवल्याचं पहायला मिळालं.

पेनल्टी शूटआऊटमध्ये मोरक्कोने पोर्तुगालला पराभूत करत उपांत्य फेरी गाठणारा पहिला अरब देश होण्याचा मान मिळवला. मात्र या विजयानंतर स्पेनविरुद्धच्या सामन्यानंतरची मोरक्कन संघाची कृती चर्चेत आली आहे. स्पेनवर विजय मिळवल्यानंतर अनेक मोरक्कन खेळाडूंनी पॅलेस्टाइनचा झेंडा फडकवत आनंद साजरा केल्याचं पहायला मिळालं. सामना जिंकल्यानंतर अशा प्रकारे मोरक्कन खेळाडूने पॅलेस्टाइनचा झेंडा फडकवण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील आठवड्यामध्ये मोरक्कोच्या जवाद अल यामीकने कॅनडाविरुद्धचा सामना २-१ ने जिंकल्यानंतरही पॅलेस्टाइनचा झेंडा फडकवला होता.

IPL 2024 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights in Marathi
CSK vs LSG Highlights , IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ६ गडी राखून विजय, स्टॉइनिसच्या १२४ धावांची खेळी ऋतुराजच्या शतकावर पडली भारी
Delhi Capitals suffered a major blow as Mitchell Marsh
Delhi Capitals : ऋषभ पंतच्या संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू अचानक IPL सोडून मायदेशी परतला
Virat's Funny reaction Video Viral
MI vs RCB : विराट कोहलीने अचानक मैदानात आपले दोन्ही कान का पकडले? VIDEO होतोय व्हायरल
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल

मोरक्कोच्या काही खेळाडूंनी ‘फ्री पॅलेस्टाइन’चे बॅनरही ई ग्रुपमधील बेल्जीयमविरुद्धच्या सामन्यानंतर झळकावल्याचं दिसून आलं होतं. या सामन्यामध्ये मोरक्कोने २-० अशा विजय मिळवल्यानंतर मैदानात बॅनरबाजी केली होती.

नक्की वाचा >> विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास

जगभरामध्ये फुटबॉलसंदर्भातील नियोजन आणि नियम करणाऱ्या जागतिक फुटबॉल संघटना म्हणजेच ‘फिफा’च्या नियमांनुसार, राजकीय, वादग्रस्त आणि द्वेषभावना निर्माण करणारे बॅनर्स, झेंडे आणि साहित्य वापरण्यावर बंदी आहे. “मैदानामध्ये कोणत्याही पद्धतीचे राजकीय, धार्मिक संदेश देणारे किंवा राजकीय अथवा धार्मिक भूमिका घेण्यावर बंदी आहे. हा नियम सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतरही मैदानामध्ये लागू होतो,” असं ‘फिफा’चे नियम सांगतात.

नक्की वाचा >> विश्लेषण: फुटबॉल जगतावर क्रोएशियाने कशी उमटवली स्वतंत्र मोहोर?

मोरक्कोच्या संघाला ‘फिफा’ने या प्रकरणामध्ये पॅलेस्टाइनचा झेंडा फडकवल्याबद्दल दंड ठोठावला आहे. अरब देशांमध्ये मोरक्को संघातील खेळाडूंच्या या कृतीचं समर्थन करण्यात आलं आङे. लिबिया, मोरक्को, इजिप्त, सौदी अरेबिया यांनी मोरक्कोचा हा विजय साजरा केला. पॅलेस्टाइनमध्येही मोरक्कोच्या विजय साजरा करण्यात आल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये पॅलेस्टाइन समर्थकांनी मोरक्कोच्या विजयानंतर जल्लोष केला.