नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे खेळवण्यात येणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारताचा तुलनेने सोप्या गटात समावेश करण्यात आलेला आहे. २८ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने आज गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केलं. भारताचा समावेश ‘क’ गटात करण्यात आला असून भारताला फक्त बेल्जियम या एकमेव तगड्या प्रतिस्पर्धी संघाचं सामना करावा लागणार आहे. १६ डिसेंबररोजी हॉकी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

बेल्जियमव्यतिरीक्त भारताच्या गटात कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात्र खडतर आव्हानाला तोंड द्यावं लागणार आहे. ड गटात पाकिस्तानसमोर नेदरलँड, जर्मनी आणि मलेशियाचं आव्हान असणार आहे.

२०१८ हॉकी विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेली गटवारी –

अ गट – अर्जेंटीना, न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स

ब गट – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, चीन

क गट – बेल्जियम, भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका

ड गट – नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान

अवश्य वाचा – अझलन शहा चषक हॉकी – भारताचा सलामीचा सामना अर्जेंटीनाविरुद्ध

विश्वचषकातील भारतीय सामन्यांचं वेळापत्रक –

१) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : २८ नोव्हेंबर

२) भारत विरुद्ध बेल्जियम : २ डिसेंबर

३) भारत विरुद्ध कॅनडा : ८ डिसेंबर