इंग्लंडचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसन याचं भारतप्रेम सर्वश्रुत आहे. पीटरसननं अनेकदा भारताबद्दलच्या त्याच्या भावना मोकळ्या मनाने व्यक्त केल्या आहेत. भारतीय संस्कृती आणि इथल्या माणसांचा स्वभाव, याविषयी पीटरसननं अनेकदा भूमिका मांडली आहे. पण आता केविन पीटरसननं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. एवढंच नाही, तर मोदींचा उल्लेख केविननं ‘हिरो’ असा केला आहे. केविन पीटरसनचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोदींच्या जंगल सफारीची चर्चा!

खरंतर केविन पीटरसनंच हे ट्वीट मोदींच्या जंगल सफारीच्या पार्श्वभूमीवर आलं आहे. रविवारी, अर्थात ९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकच्या बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पांना भेट दिली. यावेळी मोदींनी जंगल सफारीचा आनंद लुटला. मोदींच्या लुकचीही यावेळी जोरदार चर्चा पाहायला मिळाली. काळ्या रंगाची हॅट, स्टायलिश चष्मा, प्रिंटेड टीशर्ट आणि खाकी रंगाचं हाफ जॅकेट असलेला मोदींचा लुक नेटिझन्ससाठी उत्सुकता आणि चर्चेचा विषय ठरला!

Dhairyasheel Mane comment on pm narendra modi
“पंतप्रधान मोदी श्रीकृष्णासारखे सारथी, तर आम्ही…”, शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचं विधान
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

१९७३ साली भारतात व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. त्याच्या ५० वर्षपूर्तीनिमित्त मोदींचा हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोदींनी व्हिजन फॉर टायगर कन्झर्वेशन आणि स्मारकाचं नाणंही जारी केलं. मोदींनी यावेळी २०२२ च्या व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार देशातील वाघांची संख्या वाढून ३१६७ इतकी झाली आहे. २०१८ मध्ये ही संख्या २९६७ इतकी होती. २०१४ मध्ये ती २२२६ तर २०१०मध्ये ही संख्या १७०६ इतकी होती. २००६ मध्ये तर देशात अवघे १४११ वाघ होते.

पीटरसन मोदींच्या प्राणीप्रेमाच्या प्रेमात!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच दौऱ्यादरम्यानचा एक फोटो ट्वीट करून केविन पीटरसननं मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. “आयकॉनिक! वन्यप्राण्यांवर प्रेम करणारा एक जागतिक नेता, जो या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांच्यासमवेत वेळ घालवण्यासाठी प्रचंड उत्सुक असतो. लक्षात ठेवा, मोदींनी त्यांच्या गेल्या वाढदिवसाच्या दिवशी भारताच्या वन्यक्षेत्रात चित्ते सोडले होते. हिरो! नरेंद्र मोदी”, असं केविन पीटरसननं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पीटरसनचं ट्वीट व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.